प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूलमध्ये ‘केंब्रिज डे’ उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज येथील संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये केंब्रिज डे उत्साहात (23 वा वर्धापन दिन) साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मिरज पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील यांनी केंब्रिज डेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे आपल्या मनोगतांमध्ये म्हणाले, विद्यार्थ्यांना पाहून शाळेचे दिवस आठवले. पालकांनी मुलांना खरे काय आणि खोटे काय यामधला फरक जाणवून दिला पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये आपल्या पालकांसाठी काय केले पाहिजे याची जाणीव असली पाहिजे. मुलांनी संस्कार शिकले पाहिजेत जे त्यांच्या आई-वडिलांकडून व शाळेतील शिक्षकांकडून मिळतात त्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास घडतो. विद्यार्थ्यांनी जीवनात गुण न मिळवता गुण आत्मसात केले पाहिजे, म्हणजे आपण एक चांगला नागरिक बनू शकतो. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत, त्याचबरोबर मुलांनी सहनशक्ती ठेवली पाहिजे.
शाळेचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांनी सर्व विद्यार्थ्यांना केंब्रिज दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मोबाईलचा योग्य वापर करावा, प्राणायाम ही काळाची गरज आहे, ते विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे.
यावेळी आत्तापर्यंतचा केंब्रिज स्कूलचा प्रवास व स्कूल मधून घडून गेलेले गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांची चित्रफिती दाखवून मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्याचबरोबर मुलांचे स्कूलचे दिवस हे नृत्यातून दाखवून दिले.
या दिनानिमित्त प्राचार्य, डॉ. राजेंद्र मेथे, कॅम्पस को-ओडीनेटर सतीश पाटील, अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, रफिक तांबोळी, इस्टेट मॅनेजर विलास शेवाळे, समन्वयिका विद्या घुगरे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.