प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी केली पूरस्थितीची पाहणी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान  मांडुकली व किरवे येथे जाऊन  तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी  पूरस्थितीची पाहणी केली. मांडुकली येथे रस्त्यावर तीन फूट तर किरवे येथे रस्त्यावर अडीच फूट पाणी आहे. तालुक्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून कुंभी मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग  होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क करावे असे आवाहन केले.
दरम्यानआज सहा वाजता  पाटबंधारे विभाग कळे येथील अभियंता अजिंक्य पाटील यांनी कुंभी मध्यम प्रकल्पाच्या विद्युत गृहातून ३०० क्युसेक  पाणी विसर्ग होणार असून कुंभी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढणार असल्याने  नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.