प्रतिष्ठा न्यूज

तासगावात लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक बाल अतिदक्षता व बालरोग विभाग सुरु उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव येथील लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीने तासगाव शहरात पहिल्यांदाच नव्याने सुरू होत असलेल्या बालरोग विभाग व बाल अतिदक्षता विभाग NICU चें व  लहान मुलांच्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर विशाल दोशी,डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर,डॉक्टर विजय माने,डॉक्टर नदाफ,प्रताप घाडगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन थोरबोले  म्हणाले लहान मुलांना आपल्या आरोग्याच्या तक्रारी बाबतीत सांगता येत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे पालकांच्या दृष्टीने थोडेसे अवघड काम असते,मात्र आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी केल्यामुळे संभाव्य आजारांच्या वरती मात करणे सोपे जाते.लाईफ केअर हॉस्पिटलने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.त्याचबरोबर अपघात प्रसंगी  अपघातग्रस्तांना या हॉस्पिटलमध्ये मिळणारी तातडीची सुविधा ही खूप गरजेची आहे,असे गौरवोद्गार यावेळी थोरबोले यांनी काढले.यावेळी बोलताना बालरोग तज्ञ डॉक्टर दोशी म्हणाले मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी  त्यांच्या आहार तसेच व्यायाम यावर आम्ही या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत, त्याचबरोबर मुलांनी आजारी पडू नये मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठीही पालकांना आम्ही मार्गदर्शन करू असे ते म्हणाले.स्वागत पर बोलताना प्रताप घाडगे यांनी लाईफ केअर हॉस्पिटलच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला, हॉस्पिटलच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली त्याचबरोबर या पुढील काळात  तासगाव शहर व तालुक्यातील शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करण्याचा मानस व्यक्त केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.