प्रतिष्ठा न्यूज

विराचार्य बाबासाहेब कुचनुरे विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : २०१९ पासून नागरिकांवर आलेल्या आपत्ती मुळे सर्वजण अडचणीत आहेत. त्यात २०१९ ला आलेला महापूर तसेच मागील २ वर्षांपासून कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे लोकांच्या हातात काम नाही. मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या कुटुंबाचे सांभाळ करत असताना २०२१ च्या महापुराने अडचणीत आणखीन भर टाकली.
      विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना इयत्येेनुसार आवश्यक शैक्षणिक साहित्याचे किट  संस्था गेली 5 वर्षे वाटप करीत आहे.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल जाधव, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, संचालक सलमान सनदी, संस्थेच्या महिला अध्यक्ष पूनम सावंत, कलाविष्कार योजनेचे प्रमुख  तोफीक पठाण उपस्थित होते.
     सामाजिक कर्तव्य मानून आमची संस्था मदत करीत असून आपणांस या कार्यात मदत करायची इच्छा असेल त्यांनी शैक्षणिक साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावे.
स्वप्निल जाधव
संस्थापक अध्यक्ष
हॅप्पी हेल्प फौंडेशन
     मिरज
📱  7387821321
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.