प्रतिष्ठा न्यूज

उमरा / मारतळा परिसरात पत्रकार दिन साजरा: गावोगावी झाला पत्रकारांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणून दि.6 जानेवारी 2023रोज शुक्रवारी उमरा- मारतळा परिसरात विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.
मारतळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात, व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामीण भागातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व लेखणी देऊन गावचे सरपंच- बालाजी बिचेवाड, उपसरपंच- भास्करराव ढगे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला . प्रारंभी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मारतळा विभाग मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशराव ढेपे, उत्तमराव हंबर्डे, संजय देशमुख, वसंत सिरसाट, नागेश वडवळे, बालाजी शिंदे, बालाजी सिरसाट, या पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व लेखणी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी सत्काराला उत्तर देताना पत्रकार दिनाचे महत्त्व विशद केले. तर उपस्थित मान्यवरांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेल्या कार्या विषयी माहिती सांगितली.
यावेळी माजी सरपंच सुमेध गजभारे, मुख्याध्यापक व्यंकट मुगावे, प्रल्हाद पवार, रवि ढगे, देवबा होळकर, बालाजी प्यारलावार, रमेश हनवते, आदींची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.