प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे वाॅक ऑन राईट रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.6 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेड आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ,  जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी आयोजित केलेल्या वाॅक ऑन राईट या अभिनव उपक्रमास अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाला. नांदेड येथील शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी शहरातील महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर ,ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आणि शहरातील विविध शाळेतील एनसीसी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. रॅली सकाळी ठीक 8:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.  ही रॅली मल्टीपर्पज हायस्कूल,  एसपी ऑफिस , छ. शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय  अशा प्रकारे  रॅली आयोजित करण्यात आली.  या रॅलीमध्ये   विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी   विद्यार्थ्यांनी वॉक ऑन राईटच्या घोषणा दिल्या.   रस्ता सुरक्षा च्या नियमांची माहिती मिळावी आणि रस्त्याने चालतांना लोकांनी रस्त्याच्या उजव्या बाजूला , रस्त्याच्या उजव्या बाजूनेच चालावे असा संदेश देण्यात आला.  तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी उपस्थितांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठी शपथ दिली. या कार्यक्रमाचे प्रशासनाने अचूक नियोजन केले होते.
     यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा सत्र,विधी न्यायालयाचे न्यायाधीश श्री शशिकांत बांगर,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी ,परिवहन अधिकारी संदीप निमसे ,श्री कामत साहेब, शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर उपशिक्षणाधिकारी दिलीप  बनसोडे, गटशिक्षणाधिकारी आडे ,श्री मेकाले, डॉ.माणीक गाडेकर आदीजन यावेळी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.