प्रतिष्ठा न्यूज

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त सावळज येथे विनम्र अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज दि.२३ : येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
सावळज येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट, वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सावळज ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पी. एस. चव्हाण,यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मा. संदीप (दादा) मस्के यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी शिवसेनेचे अनिल (भाऊ) शिंदे, संदिप (दादा) मस्के, सुनील मगदूम, शिवसेनेचे सावळज शाखाप्रमुख पिंटू कुंभार, तसेच सर्वच मान्यवर मंडळींनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले यावेळी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.