प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख पदी सुहास पाटील खराणे यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड शिवसेना ( शिंदे गट) दक्षिण सिडको- हडको शिवसेना शहर प्रमुख पदी वसरणी येथील तरुण कार्यकर्ते सुहास पाटील खराणे यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याचा दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र शिवसेना सचिव- संजय मोरे, संपर्कप्रमुख तथा शिवसेना उपनेते- आनंद जाधव, अमित गीते, जिल्हाप्रमुख- आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, उपजिल्हाप्रमुख- बिल्लू यादव, शहर प्रमुख- यादव, तालुकाप्रमुख- उद्धव शिंदे, यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शंकर पिनोजी, अमोल पवार, विकास देशमुख, सह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या निवडी बद्दल वसरणी- सिडको- हडको परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करून त्यांना पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.