प्रतिष्ठा न्यूज

नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : भुसावळ विभाग, मध्य रेल्वे मधील जळगांव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर दिनांक 29 मे 2023 ला दुपारी 15.30 (3:30) ते 30 मे ला दुपारी 15.30 (3:30) वाजे पर्यंत या 3 लाइनसाठी यार्ड रीमॉडेलिंगच्या प्री-क्षा आणि नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 24 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुढील गाड्या अकोला मार्गे वळविण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे
*गाड्यांच्या मार्गात बदल श*
1) दिनांक 30 मे 2023 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12753 नदिड हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्कक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भुसावळ मार्गे न धावता हिंगोली, अकोला, मलकापुर भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.
2) दिनांक 29 मे 2023 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 नांदेड- अमृतसर
सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगांव,
भुसावळ मार्गे न धावता हिंगोली, अकोला, मलकापुर भुसावळ बायपास लाइन मार्गे धावेल.
3) दिनांक 30 मे 2023 रोजी अमृतसर येथून सुटणारी गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस भुसावळ स्टेशन, जळगांव, चाळीसगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे न धावता भुसावळ बायपास लाईन, मलकापुर, अकोला, हिंगोली मार्गे धावेल.
अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.