प्रतिष्ठा न्यूज

आजारी गायीवर महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वेळीच उपचार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आयुक्त शुभम गुप्ता यांनी उप आयुक्त वैभव साबळे यांना सदर गाय वर तातडीने उपचार करण्यासाठी सूचना दिल्या होत्या,त्या नुसार उप आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करून सांगलीतील चांदणी चौक येथे गाय वर उपचार सुरू केले होते. त्या मुळे रस्त्यावर मधोमध पडलेल्या आजारी गाईला जीवदान दिले.
आयुक्त गुप्ता याना या गायीबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्या आजारी गाईवर वेळीच उपचार करण्यात आल्याने त्या गायीचे प्राण वाचवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले.

त्यामुळे या निमित्ताने महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची मुक्या जनावरांबद्दलची
संवेदनशीलता पाहायला मिळाली. या कामगिरीबद्दल आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यानी याबद्दल महापालिका पशू वैद्यकीय अधिकारी यांचेही कौतुक केले.

बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास चांदणी चौकातील बुलढाणा बँकेसमोर एक गाय आजारी असून ती रस्त्याच्या मधोमध पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिक जोशी काका यानी महापालिकेला दिली. या नंतर आयुक्त शुभम गुप्ता यांनी उपआयुक्त वैभव साबळे याना त्या गायीवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले होते. यानंतर उपायुक्त साबळे यांनी तातडीने महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोस्वामी याना ही माहिती कळविली. यानंतर गोस्वामी यांनी तातडीने आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर डॉ. गोस्वामी यांनी महापालिकेचे कर्मचाऱ्यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहचून त्या गायीला उचलून रस्त्याच्या बाजूला घेतले. त्यानंतर त्या गायीला तातडीने महापालिकेने रिसाला रोडवरील पशू वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.
याठिकाणी डॉ. अरविंद ढगे आणि मनपाचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. गोस्वामी यांनी संयुक्तरित्या त्या गायींवर प्राथमिक उपचार केले. त्यामुळे त्या गायीचे प्राण वाचले. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने एका गायीला जीवदान मिळाले. या घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांनीही मनपाच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गोस्वामी आणि त्यांच्या टीमचे नागरिकांनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.