प्रतिष्ठा न्यूज

सांगली कॉंग्रेस भवनमध्ये नाना पटोले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्राला पर्यायाने देशाला मजबूत करण्यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार आणणे हीच नाना पटोले यांच्या वाढदिवसाची भेट ठरू शकेल आज काँग्रेस भवन सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस अंतर्गत सर्व संघटनाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून नानाभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना सुभाष तात्या यांनी सांगली लोकसभेसाठी विशाल दादा पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांच्यासाठी प्रत्येक गावात जाऊन त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे भाजप सरकारच्या या कारकिर्दीमध्ये जनता महागाईने त्रस्त झाली आहे बेरोजगारी वाढली आहे अशावेळी काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम केले पाहिजे असे सुभाष पती आणि मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस अंतर्गत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीसाठी नियोजन करावे निवडणुका केव्हाही हो होत जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन काँग्रेसचे झालेले योगदान देशासाठी योगदान याची माहिती दिली पाहिजे प्रत्येक गावोगावी वाडी वस्तीवर संपर्क ठेवला पाहिजे असे सांगितले प्रारंभी ओरिसा येथील रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना व सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष संपतराव नाना माने यांचे चिरंजीव किरण माने त्यांचे दुःख द निधन झाले त्याबद्दल सर्वांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी जिल्हा काँग्रेसचे खजिनदार पी एल रजपूत सर उपाध्यक्ष अजित शिरगावकर रोजगार सोय रोजगार से धनंजय कुलकर्णी सोशल मीडियाचे आरिफ मालगाव पद्मावती पुजारी सुवर्णा रेळेकर पल्लवी खोकले सीमा कुलकर्णी जुबेदा बिजली सुभाष रेळेकर मनोज पवार अशोक गाढवे महेश शिंदे शरद चव्हाण अजहर शेख शैलेंद्र पिराळे अजित माने विश्वास यादव अभय मोरकाने रावसाहेब पाटील महेश खंदारे विठ्ठलराव काळे सुरेश गायकवाड संजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते तदनंतर प्रमुख उपस्थिती मध्ये शाळा नंबर आठ जवळील निवारा संघ मध्ये स्थानिकांना ना ना भाऊ पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिलेबी बिस्किट आणि केळी यांचे वाटप करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.