प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिके कडून पानीपट्टीत वर्षाला 400 रुपयांची वाढ; नागरिकांच्या हरकती विचारात घेणार – मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगर पालिकेने 1/4/2023 पासून पाणीपट्टी मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत नगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांना आवाहन करून सांगितले आहे की पाणीपट्टी दरामध्ये वर्षाला ४०० रूपये ( महिना ३३ रुपये ) वाढ केली असून जिल्हातील आजूबाजूच्या शहराच्या तुलनेत तासगाव नगर पालिका नागरिकांना रोज मुबलक स्वरूपात पाणीपुरवठा करते.यासाठी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विजबिल ( २ फिल्टर प्लांट, ५ पाणी टाकी, भिलवडी जॅकवेल ) महिन्याला जवळपास १८ लाख ( वार्षिक २.२५ कोटी ) ईतके येते.यासाठी जवळपास ४० कर्मचारी काम करत आहेत. नगरपालिकेकडे शासकीय कर्मचारी कमी असलेने कंत्राटी कर्मचारीमार्फत यामधील बरेच काम केले जाते व त्यांच्या पगारावर वर्षाला जवळपास ३० लाख ईतकी रक्कम खर्च पडते. ही योजना आत्तापर्यंत शासनाच्या वित्त आयोगाच्या निधीवर चालत होती.१५ वा वित्त आयोगापासून स्थानिक स्वराज्य संस्थाना या योजना स्वबळावर चावलण्याची आवश्यकता असून आजमितीला पाणीपुरवठा उत्पन्न पाहता जवळपास 1.5 कोटी वार्षिक तुटीत ही योजना सुरू आहे. अशा सर्व कारणांनी चालू आर्थिक वर्षापासून महिन्याला ३३ रूपये पाणीपट्टी वाढीचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.या निर्णयाबाबत नागरिकांना काही हरकत किंवा सुचना असल्यास २७/०६/२३ अखेर नगरपालिका कार्यालायात लेखी अर्जाने दिल्यास विनम्रपणे अशा बाबी विचारात घेणार आहोत,त्यामुळे
समस्त तासगावकरांनी सहकार्य करावे अशी विनंती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.