प्रतिष्ठा न्यूज

गुजरात नॅशनल गेम मल्लखांब स्पर्धेसाठी सांगलीच्या बापू समलेवाले यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
 सांगली : ७ ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीसाठी इंडियन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने संस्कारधाम, बोपल, अहमदाबाद (गुजरात) येथे नॅशनल गेम्स २०२२ अंतर्गत प्रथमच अधिकृतरित्या मल्लखांब स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांकरीता महाराष्ट्र खजिनदार, सांगली जिल्हा अमॅच्युअर मलखांब असोसिएशन सांगली संघटनेचे सचिव, व छत्रपती पुरस्कार विजेते बापू समलेवाले यांची मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेमार्फत तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या वेळी मोहन वानखंडे, संघटनेचे खजिनदार दीपक सावंत, काजल काळे, हेमंत सावंत हे उपस्थित होते. बापू समलेवाले यांनी चार दशकाहून अधिक काळ राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडवले आहेत. समलेवाले हे मल्लखांब व जिम्नॅस्टिकचे एन. आय. एस. प्रशिक्षक म्हणून भारतात व परदेशात खेळाडूंना मार्गदर्शन करून मलखांब खेळाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करत आहेत. त्यांना संघटनेचे अध्यक्ष सम्राट बाबा महादेव, शहर अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष मनोहर सारडा, कार्याध्यक्ष गौतम पाटील व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन मिळत आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.