प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत बुधवारी लव्ह साँगचा धडाकेबाज कार्यक्रम : सर्जेराव गायकवाड यांना कला क्षेत्रातील जीवनगौरव जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपकडून बुधवार दि.16 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता भावे नाट्य मंदिर सांगली येथे 90 च्या दशकातील चित्रपटातील लोकप्रिय लव्ह साँगवर आधारित कराओके गाण्यांचा धडाकेबाज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. अशी माहिती आयोजक दीपक चव्हाण यांनी दिली.
या तीन तासाच्या कार्यक्रमात अशिकी , दिलं, कयामतसे कयामत, दिवाना, फुल और काटे, दिलवाले, ये दिल्लगी, दिलं तो पागल है, मोहबते , तेजाब यासह अनेक चित्रपटात लोकप्रिय असलेली गाणी ऐकवयास मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंत सर्जेराव गायकवाड यांचा कला क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.