प्रतिष्ठा न्यूज

तिसंगी येथे किशोरवयीन मुली व मातांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : नवरात्र उत्सव काळात म्हणजेच २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर कालावधीत राज्यात सर्वत्र ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ अभियान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने तिसंगी येथे दत्ताजिराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन मुली, मातांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिर झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही डी पाटील होते.
या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मानव अधिकारी संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक व न्याय जिल्हा कार्याध्यक्ष जी एस कांबळे, व गगनबावडा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी नलवडे होते.
या अभियानाअंतर्गत गर्भधारणा पूर्व काळजी आणि मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसन मुक्ती, पोषण याबाबत वैद्यकीय अधिकारी नलवडे यांनी माहिती दिली. शिबिरात किशोर वयीन मुली, माता यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच बंकट थोडगे, राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, महालॅब चे संतोष देसाई, आरोग्य विभागाचे डॉक्टर शबाना मुजावर, प्रिया तांदळे, रविंद्र कांबळे, प्रकाश देसाई, बापू पाटील आदींनी सहभाग नोंदवला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.