प्रतिष्ठा न्यूज

तासगावात अंनिसकडून निर्भया मॉर्निंग वॉकचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या १०व्या स्मृती दिनानिमित्त अंनिसच्या वतीने निर्भय मॉर्निंग वाॅकचें आयोजन करण्यात आले होते, यावेळी देहदान संकल्प पत्र वाटप करण्यात आले.डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मुख्य सुत्रधार अजुनही मोकाटच फिरत आहेत त्यांना पकडून शिक्षा व्हावी यासाठी तासगाव अंनिस शाखेच्या वतीने अहिंसात्मक मार्गाने आंदोलन गेली दहा वर्षे अविरतपणे सुरू आहे,हा लढा न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार असल्याच्या निर्धाराने कार्यकर्ते सहभागी झाले होते.                                       यावेळी कमांडो करीयर अकॅडमीचे संचालक जाधव व त्यांचे विद्यार्थी, राष्ट्रसेवा दल अध्यक्ष नुतन परिट, स्वराज्य पक्ष जिल्हा अध्यक्ष शशीकांत डागे,वंचित बहुजन आघाडी शिवाजी गुळवे,शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव जाधव,का्ॅग्रेसचे सचिन पाटील,शरद शेळके,मनोज पाटील,डॉ सतिश पवार,अंनिस शाखेच्या अध्यक्ष छायाताई खरमाटे,उपअध्यक्ष हेमलता बागवडे, संचिता सावंत,रविंद्र सावंत,शंकर पाटील,अंकुश जाधव,विकास यादव,राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे उपस्थित होते.आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या दोषींवर कारवाई केली जात असताना मुख्य सूत्रधार अजुन ही मोकाट पणे फिरत आहे,त्याला लवकरात लवकर अटक होवून शिक्षा व्हावी यासाठी आपण जमलो आहोत,अशी आंदोलने न्याय मिळेपर्यंत करावी लागणार आहेत ती करत राहू दाभोळकरांच्या विचारांचा जागर जणमाणसात रूजविण्यासाठी काम करत राहू हीच खरी आदरांजली ठरेल असे मत प्रा डॉ बाबुराव गुरव यांनी मांडले,यावेळी देहदान संकल्प पत्राचे वाटप करताना पंचवीस कार्यकर्त्यांनी आपला देहदानाचा संकल्प घेतला त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.वैभव गुरव,अविनाश घोडके,समीर कोळी,सुधीर नलवडे, सचिन जाधव,प्रा वासुदेव गुरव,ज्योती गुरव,शिवांश गुरव,ऋतुजा खोत,वैष्णवी यादव,विशाल खाडे सर यांनी सहयोग दिला,सूत्रसंचलन अंनिस कार्य अध्यक्ष अमर खोत यांनी केले,आभार अंनिस जिल्हा अध्यक्ष भाई बाबुराव जाधव यांनी मानले.संयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.