प्रतिष्ठा न्यूज

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच तासगावच्या नेत्यांचं टिका आणि आंदोलन : डॉ.भारत पाटणकर

फेर आराखड्याला पुरेसा निधी मिळण्यासाठी सगळ्यानी एकत्र येऊन पाणी संघर्ष चळवळीला साथ द्यावी

प्रतिष्ठा न्यूज
तासगांव (प्रतिनिधी ) : “१९९३ सालापासून पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटपासाठी अभ्यास आणि संघर्ष झाले. या संघर्षांमुळेच आज तासगाव, आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील सर्व गावांमधील सर्व कुटुंबाना पाणी देण्यासाठीचा फेर आराखडा तयार झाला असून तो अमलात आणण्यासाठी पुरेसा निधी मिळण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व गावे पाणी मिळण्यात समाविष्ट असतानाच चुकीच्या पद्धतीने मागण्या करून राजकारण करणे थांबवावे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एकमेकांच्यावर राजकीय टीकाटिप्पणी करणे व आंदोलनाची भूमिका घेण्यापेक्षा तासगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी तालुक्यातील सर्व गावांमधील सर्व कुटुंबाना पाणी देण्यासाठीचा फेर आराखडा तयार झाला असून, तो अमलात आणण्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळण्यासाठी सगळ्यानी एकत्र येऊन पाणी संघर्ष चळवळीला साथ दयावी आणि तासगाव तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपवावा.” असे आव्हान डॉ.भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल यांनी आज तासगाव तालुक्यातील सर्वच सर्वच राजकीय पक्षांना केले.

डॉ. भारत पाटणकर यांच्या मते , “सध्याच्या काळात सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्या पाठोपाठ, तासगाव तालुक्याची समन्यायी पाणी वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असून, तासगाव तालुक्यामधील ७१ गावांपैकी ज्या ज्या गावांचा शेतीला पाणी देणाऱ्या कोणत्याही योजनेत समावेश नाही. त्यांना पाणी योजनेत समावेश करणे आणि समन्यायी पद्धतीने पाणी देण्यासाठी योजना करून त्यांची अंदाजपत्रके आणि आराखडे तयार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला असून, त्याची पक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या वंचित गावांमध्ये कचरेवाडी, विजयनगर, धोंडेवाडी, किंदरवाडी, नरसेवाडी, यमगरवाडी, दहिवडी, डोंगरसोनी, वायफळे, बिरणवाडी, लोकरेवाडी, सावळज आणि जरंडी या गावांचा समावेश आहे. या बरोबरच ज्या गावांमधील सर्व कुटुंबांना पाणी देण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी पुरवण्याची मूळ आराखड्यात तरतूद नाही. अशाही गावांना पाणी देण्यासंबंधी नियोजन आराखडा करण्याचे ठरलेले आहे. मूळ आराखड्याप्रमाणे सर्व कुटुंबांना देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसणारी गावे. नागाव ( निमणी ), तासगाव, कुमठे, धुळगाव, कौलगे, सावळज, सिद्धेवाडी, नागेवाडी, वडगाव, गव्हाण, पेड, मांजर्डे, मोराळे, शिरगाव (कवठे), निमणी, नेहरूनगर, जुळेवाडी अशी आहेत. या १८ गावांचाही फेर आराखडा करण्याचे ठरलेले आहे. या दृष्टीने नव्या योजना खालील प्रमाणे आखण्यात आल्या आहेत. सुळेवाडी उपसा सिंचन योजना. गोरेवाडी डावा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली. नागाव(निमणी) उपसा सिंचन योजना. वासुंबे-तासगाव उपसा सिंचन योजना. कुमठे- धुळगाव बंदिस्त नलिका वितरण योजना. गव्हाण उपसा सिंचन योजना भाग-२. पेड- मांजर्डे-मोराळे बंदिस्त नलिका वितरण योजना. सिद्धेवाडी-जरंडी-सावळज-कौलगे उपसा सिंचन योजना. जुळेवाडी उपसा सिंचन योजना. शिरगाव कवठे-निमणी-नेहरू नगर उपसा सिंचन योजना आहेत.”

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.