प्रतिष्ठा न्यूज

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत सायकल रॅली संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली सायकल रॅली काढण्यात आली.

सुनील पवार आयुक्त तथा प्रशासक यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना २६व्या वर्धापनदिन हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्मचारी अधिकारी वर्ग या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

या सायकल रॅलीची सुरुवात विश्रामबाग येथून करण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार, अति आयुक्त चंद्रकांत खोसे , उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे ,पंडित पाटील यांच्यासहित महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकल पटू, विविध शाळेचे विद्यार्थी, वेगवेगळ्या पर्यावरण प्रेमी संस्था सायकल प्रेमी ग्रुप या सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये अंदाजे अडीचशेहून अधिक सायकल पटू सहभागी झाले होते. महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.