प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे मराठा समाजातील प्रज्ञा, प्रतिभावंताचा गौरव सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड आयोजित प्रज्ञा-प्रतिभावंतांचा गौरव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब, प्राचार्य अर्जुन तनपुरे,राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपवनसंरक्षक केशव वाबळे,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम रोहित तोंदले, अधीक्षक अभियंता आशिष चौगले,कार्यकारी अभियंता डी आर सावंत, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई काळम कदम,तहसीलदार मंजूषा भगत,वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन पानपट्टे,जिल्हा कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, मधुकरराव देशमुख, प्रदेश सहसचिव प्राचार्य पंजाबराव चव्हाण,विभागीय अध्यक्ष लिंबराज सुर्यवंशी  इंजि.शे.रा.पाटील, डाॅ.सोपानराव क्षीरसागर,प्रा.संतोष देवराये आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व क्षेत्रातील दैदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या प्रज्ञा प्रतिभावंत विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन  शिवश्री रमेश पवार यांनी केले. या कार्यक्रमास समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.