प्रतिष्ठा न्यूज

दैनिक ललकारचे संपादक बापूराव खराडे यांचे निधन

सांगली प्रतिनिधी : दैनिक ललकारचे संस्थापक संपादक बापूराव (अण्णा) दत्तात्रय खराडे (वय ९३) यांचे सोमवारी निधन झाले.
मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सांगली येथील पत्रकार नगर मध्ये दैनिक ललकारच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बा. द. खराडे या नावाने संपूर्ण महाराष्ट्रा त्यांना ओळखतो. सांगलीच्या पत्रकारितेत स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांची पत्रकारिता नेहमीच चर्चेत असायची. अत्यंत परखडपणे त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविला. अनेक वेळा त्यांच्यावर जिवघेणे हल्ले झाले होते.
प्रतिष्ठा न्यूज परिवारातर्फे बा. द. खराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.