प्रतिष्ठा न्यूज

चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची दक्षता घ्या पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे निर्देश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. २३ : वाहतुकीची होणारी कोंडी आणि लोकहिताचा विचार करून चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करून हे काम जलद गतीने पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.  या परिसरातील नागरिकांना वाहतुकीची सोय व्हावी यासाठी रेल्वे उड्डाण पुलाचे खाली पर्यायी व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी रेल्वे व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सांगली-तासगाव रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुल बांधकाम अनुषंगाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील पालकमंत्री कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मध्य रेल्वेच्या दक्षिण झोनचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले, चिंतामणीनगर व परिसरातील लोकांना रहदारीची सोय व्हावी यासाठी रेल्वे पुलाखाली करण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने रेल्वे विभागास पत्र द्यावे. रेल्वेनेही यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक यंत्रणेस उपलब्ध करून द्यावे. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.
तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगली-तासगाव रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुल बांधकाम परिसराची पाहणी केली. उड्डाण पूल, परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग याबाबत अधिकारी व नगरिकांशी चर्चा केली व या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल असे उपस्थित नागरिकांना आश्वासित केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मध्य रेल्वेच्या दक्षिण झोनचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रंतीकुमार. मिरजकर, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, रेल्वेचे अधिकारी शंभो चौधरी  व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.