प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूलचा जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. २३ : जिल्हा क्रीडा संकुल व मनपा सांगली यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरज च्या 19 वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांचा सत्कार शाळा अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन,शाळेचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या मुलींच्या संघात आदिती हजारे, सृष्टी साळुंखे, झारा पठाण, जानवी सपकाळ, हर्षदा राजमाने या खेळाडूंचा समावेश होता. त्यांना संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, समन्वयक विद्या घुगरे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडुंना शाळेचे क्रीडा शिक्षक दीपक शेलार यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.