प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सेवा मोफत उपलब्ध

प्रतिष्ठा न्यूज 

पंढरपूर प्रतिनिधी : कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. २४ जुन २०२३ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६६४३) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.०३ जुलै २०२३ (सायं. ५.०० वाजेपर्यंत) चालणार आहे. अशी माहिती काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि. ०३ जुलै २०२३ (सायं. ५.०० वाजेपर्यंत) चालणार आहे.
विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन साठी येताना आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल नंबर सोबत असणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी प्रा. अभिजित सवासे (९८९०५६५८१०), प्रा. उमेश घोलप (८०५५१०३७१५), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम (९४२३७४११५०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर सिंहगड काॅलेज कडून करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.