प्रतिष्ठा न्यूज

इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वेश हातनेला खासदार राहुल गांधींनी दिला कॉम्प्युटर भेट

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नांदेड येथील सर्वेश हातणे या विद्यार्थ्याला गरिबीमुळे कॉम्प्युटर सुध्दा पाहता आला नव्हता. हे लक्षात आल्या बरोबर खासदार राहुलजी गांधी यांनी आज दि 11 नोव्हेंबर रोजी या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर भेट देऊन त्याचे इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाला शुभेच्छा दिल्या.
“भारत जोडो” यात्रा नांदेडला येत असताना राहुल गांधी यांची दोन मुलांनी भेट घेतली असता या मुलांनी आम्हाला सॉफ्टवेयर इंजीनियर होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. पण त्याचवेळी आपण आजपर्यंत कॉम्पुटर (संगणक)पाहिला नाही.आमच्या शाळेतही संगणक नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे लक्षात येताच खासदार राहुल गांधी यांनी या मुलाला नवा संगणक भेट दिला आहे. या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशअध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. त्यामुळे या मुलाचे स्वप्न पुर्ण होण्यास यश नक्की मिळणार आहे.
यावेळी खासदार गांधी यांनी ही एका मुलाची गोष्ट झाली, देशातील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक मुलाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी भावना यांनी व्यक्त केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.