प्रतिष्ठा न्यूज

शिवप्रतापाच्या (अफझलखान वधाच्या) शिल्पाची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई व इतिहास तज्ज्ञांच्या कमिटीकडून पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अफझलखानाच्या बेकायदेशीर दर्ग्या विरोधात विधानपरिषदेमध्ये 2001 साली आवाज उठवून श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफझलखानाच्या बेकायदेशीर दर्ग्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले. या शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनामुळे शासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करण्यास सुरुवात झाली, सातारा जिल्ह्यामध्ये शिवप्रताप दिनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली, अफझलखानाच्या नावाने अनेक वर्षे भरणारा ऊरुस बंद झाला, अफझलखानाचा बेकायदेशीर दर्गा सिल करण्यात आला, वनखात्याच्या जागेवर असणारे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले. तसेच गेल्या वर्षी शिंदे – फडणवीस सरकारने धाडसी निर्णय घेत अफझलखानाच्या थडग्या भोवतीचे सर्व बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले.

श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या लढ्यातील शेवटची मागणी म्हणजे अफजलखान वधाच्या जागेसमोर अफजलखान वधाचे शिल्प उभा करून त्या शिल्पावर हिंदी इंग्रजी मराठी मध्ये अफजल खान वधाचा इतिहास लिहून त्या परिसराचे नामकरण शिवप्रताप भूमी असे करावे ही होती. त्या श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या मागणीनुसार शिवप्रतापाचे शिल्प बनविण्याचे काम सुरू झालेले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्या शिल्पाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे, मुंबईचे डिन प्रोफेसर विश्वनाथ साबळे, इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे, मुर्तीकार नितीन मिस्त्री, किशोर ठाकूर, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक डॉ. विजय सपकाळ, शशिकांत काकडे व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.

यावेळी इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अफजलखानाच्या लढाई दरम्यान असलेल्या वयाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वय वर्षे 29 व अफजलखानाचे वय वर्षे 55 ते 60 च्या दरम्यान असल्याने त्या वयाप्रमाणे दोघांची चेहरेपट्टी असावी असे सुचवले. त्याचबरोबर मूर्तिकार किशोर ठाकूर व नितीन मेस्त्री यांनी काही सूचना केल्या. तसेच हिंदू एक आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी देखील या कमिटीस काही सूचना केल्या.

यावेळी गजानन मोरे, चेतन भोसले, श्रीधर मेस्री उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.