प्रतिष्ठा न्यूज

‘परशुराम’ मध्ये व्याघ्र दिन व वनमहोत्सव व वृक्षदिंडी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.30 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरा होत आहे. आज व्याघ्र दिन व वनमहोत्सव निमित्ताने येथील परशुराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज या प्रशालेत आज वृक्षारोपण केले. त्यानंतर गगनबावडा गावामध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी गगनबावडा वन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या जवळपास 75 रोपांचे वृक्षरोपण करण्यात आले . तसेच लावलेल्या रोपांचे संवर्धन व जतन करण्याची शपथ विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतली.


यावेळी गगनबावडा सामाजिक वनी करण विभागचे वनक्षेत्रपाल सौ. एस. बी पाटील , विद्यालयाचे प्राचार्य रंगराव गोसावी , सुरेश थोरात , शीतल पत्रावळे, कल्पना पावरा , अश्विनी खोराटे , वनपाल पी. एन डफडे, वनरक्षक पी. एस. घाटगे,वनमजूर के. जी. खेतल, बी. बी. कोळापटे, लिपिक वृषाली लोहकरे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.