प्रतिष्ठा न्यूज

मारतळा नवीन तालुका निर्मितीसाठी पदाधिकारी- सरपंच- उपसरपंच यांचे- मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील मारतळा हे मोठी बाजारपेठ असलेले गाव असून या गावाला नविन तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्या बाबतचे निवेदन उमरा जिल्हा परिषद सर्कल मधील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
मारतळा नविन तालुका व्हावा ही गेल्या अनेक वर्षा पासूनची या परिसरातील गावांची मागणी आहे. मारतळा हे नांदेड- हैद्राबाद या राज्य मार्गावरील गाव असून येथे परिसरातील जवळपास 40 गावाशी संपर्क असतो. येथे आडत दुकान, दवाखाने, सोने चांदी दुकान, किराणा दुकान, कापड मार्केट, कृषी सेवा केंद्र, शाळा, महाविद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो. मारतळा तालुका झाल्यास या भागातील नागरीकांना सोईचे होईल. या सर्व बाबीचा सहानुभूती पूर्वक विचार करुन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी आपल्या स्तरावरून मारतळा नवीन तालुका होण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष- भास्कर पाटील जोमेगावकर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य- भास्कर पाटील ढगे, काँग्रेस सेवादलाचे लोहा तालुकाध्यक्ष- उद्धव पाटील ढेपे, बालाजी विच्चेवाड, (सरपंच- मारतळा) श्रीमती गोदावरी शिंदे, (सरपंच- जोमेगाव) पंजाबराव माळेगावे (सरपंच- धनज बु ) बळीराम पाटील बेटकर (सरपंच- वाळकी बु ) संतोष पाटील जाधव (सरपंच प्रतिनिधी पिंपळदरी) साईनाथ पवार (सरपंच- उमरा) भगवान घोडगे (सरपंच- डोनवाडा) विजय जाधव (उपसरपंच- सुगाव) सोपान जाधव (सरपंच- हिंदोळा) नागोराव कापसे (सरपंच- कापशी खु.) गोपीराज हंबडे (उपसरपंच- वाका) धम्मानंद तारु (सरपंच- गोळेगाव) गोविद जाधव (मा.सरपंच- चिंचोली) आदींच्या सह्या आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.