प्रतिष्ठा न्यूज

माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे मा. महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री.अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नाईकवाडी, माजी समाजकल्याण सभापती बिरेंद्र थोरात,नीयाज तांबोळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.