प्रतिष्ठा न्यूज

रामराज्यात स्त्री मोकळा श्वास घेत होती ; आचार – विचार व उच्चारात माणसाला रमविणारा लोकाभिराम म्हणजे श्रीराम : धनश्री लेले

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२५ :पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि डॉ. पतंगराव कदम फौंडेशन या संस्थांनी सांगलीत अयोध्या राममंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभी केली आहे. यामुळे सांगली राममय होऊन पवित्र, प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. जिथं श्रीराम कथा तिथं हनुमंत असतात.. रामराज्यात स्त्रीला व्यक्त होता येत होतं.. तिला मोकळा श्वास घेण्याचे स्वातंत्र्य होते. माणसाला आचार – विचार व उच्चार या तिन्ही बाबतीत रमविणारा श्रीराम लोकाभिराम आहे.सगळ्यात रमणारा व रमविणारा, आई – वडिलांच्या सेवेत रमणारा, स्त्रियांवर हात न उगारणारा, परस्त्री कडे वाईट नजरेने पाहू नये, दुसऱ्यांना लुबाडू नये हे विचार पेरणारा श्रीराम सहिष्णु आहे असे प्रतिपादन प्रख्यात वक्त्या धनश्री लेले यांनी केले.
त्या सांगलीत श्रीराम भक्ती उत्सवात ‘लोकाभिराम श्रीराम’ या विषयावर बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी आयोजक पृथ्वीराज पाटील होते.

स्वागत व प्रास्ताविक करताना आयोजक पृथ्वीराज पाटील यांनी ‘सगळ्यांनाच अयोध्येला जाणं शक्य होईलच असं नाही. सांगलीतच भक्तांना श्रीराम दर्शनाची सोय करण्यासाठी अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभी केली आणि हजारो सांगलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.. सांगली राममय होऊन वातावरण पवित्र व प्रसन्न झाले आहे असे सांगून सांगलीकरांना धन्यवाद दिले.

प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी धनश्री लेले यांचा परिचय करून दिला.
सौ. लेले यांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन पृथ्वीराज पाटील व मिनाक्षी शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सौ. लेले यांनी श्रीराम जन्मापासून वनवास व शेवटी झालेल्या राज्याभिषेक पर्यंतच्या श्रीराम कथा सांगत श्रीरामांची मूल्ये स्पष्ट केली. श्रीराम एक वचनी, एक बाणी व एक पत्नी होते. हा आदर्श दुर्मिळ होत चालला आहे. आपल्या मुलांवर हे संस्कार करायला हवेत. प्रतिकूल परिस्थितीवर खंबीर होऊन मात करता येते हा गुण त्यांचाकडून शिकता येतो. असे सांगितले.

यावेळी केंद्र शासनाच्या निमंत्रणावरून अयोध्येला जाऊन आलेले श्री. मनोहर सारडा यांचा सपत्नीक सत्कार पृथ्वीराज पाटील व सौ. विजयाताई पाटील, लतादेवी जाधव कोल्हापूर यांचा सत्कार रोहिणी शिवराज पाटील व विजया पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजनात सहाय्य केल्याबद्दल रमाकांत घोडके, रावसाहेब पाटील यांचा व उपस्थित मान्यवर माजी महापौर सुरेश पाटील, नगरसेवक लक्ष्मण नवलाई व उद्योगपती बेनाडीकर अजित पाटील दादा आणि श्रीपाद चितळे यांचा सत्कार पृथ्वीराज पाटील यांनी केला. या मान्यवरांच्या हस्ते श्रीराम आरती करण्यात आली.
यावेळी विरेंद्रसिंह पाटील, एन. एम. हुल्याळकर, बिपीन कदम, सनी धोतरे, डॉ.राजेंद्र मेथे, मृणाल चेतन पाटील, आशा पाटील, शुभांगी साळुंखे, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, जयदीप पाटील, अजय देशमुख, अशोकसिंग रजपूत, नामदेव चव्हाण, सुशांत गवळी, शितल सदलगे, अल्ताफ पेंढारी, दिलीप पाटील, आयुब निशाणदार, राजेंद्र कांबळे, प्रशांत कांबळे, आदिरज पाटील, संजय मोरे, यांनी रामभक्तांचे स्वागत केले.याप्रसंगी सांगलीकर रामभक्तांची दर्शन व व्याख्यानासाठी अलोट गर्दी झाली होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.