प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेजची विद्यार्थीनी कु.प्राप्ती आळंदकर वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : जिल्हा प्रशासन नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विधमाने आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरिय वतृत्व स्पर्धेत राजर्षी शाहू विद्यालयाची इयत्ता दहावी ( ब) या वर्गातील विद्यार्थ्यांनी कु. प्राप्ती संतोष आळंदकर हिने प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यातून प्रथम आली आहे.
कुसुम सभागृह येथे एका कार्यक्रमात कू.प्राप्ती आळंदकर चा रोख बक्षीस रु. 2500 पारितोषक , सन्मान पत्र प्रदान करण्यात येऊन गौरव करण्यात आला.
तसेच तिच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने पुष्पहार घालून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कु. प्राप्ती आळंदकर हिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री बी.एम.हंगरगे , उप मुख्याध्यापक डॉ.पांडूरंग यमलवाड, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत, कस्तूरबा विद्यालय मु.अ. श्री सुर्यकांत टापरे सहशिक्षक आनंद मोरे,नागनाथ केंद्रे,श्री टी.एन. रामनबैनवाड, श्री आर एच.कदम, डॉ.एम.एम.गाडेकर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शिवानंद टापरे,श्री रत्नाकर कोत्तापल्ले,श्री बालासाहेब माने, श्री संतोष बिरादार,श्री गोपाळ मोरे,श्री राजेश मोरे, श्री धनाजी बस्वदे,तसेच श्रीमती जायेभाये,श्रीमती खुळे ,श्रीमती पावसे आदिजणांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.