प्रतिष्ठा न्यूज

पंधरा वर्षे पोलीस पाटील पद रिक्त : प्रशासनाचे अजब उत्तर

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा या तालुक्याचे ठिकाणी गेले १५ वर्ष पोलीस पाटील पद रिक्त आहे. पूर्वीचे पोलीस पाटील वयोमानानुसार निवृत्त झाल्याने   तेंव्हा पासून आज तागायत पोलीस पाटील पद न भरता पदाचा चार्ज नाजिकच्या पोलीस पाटील यांच्याकडे दिला गेला आहे. तालुक्याचे ठिकाणचेच पोलीस पाटील पद रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत  प्रशासनकडे चौकशी केली असता तालुक्यामध्ये  गगनबावडा येथे पोलीस स्टेशनं व साळवन येथे पोलीस  चौकी असल्यामुळे या दोन ठिकाणी पद भरता येत नाही. असं सांगितलं जात. पदाची गरज नाही तर नजीकच्या गावच्या पोलीस पाटलांकडे गावचा चार्ज का दिला जातो. असं सवाल जनतेतून येत आहे. तरी प्रशासनाने याचा विचार करून कार्यवाही करावी व रिक्त पोलीस पाटील पद भरावे. यासाठी गगनबावाडा ग्रामपंचायत मार्फत उपविभागीय अधिकारी करवीर/गगनबावडा, मा.तहसीलदार यांना निवेदन देणेत आले आहे. यावेळी गगनबावड्याचे सरपंच सौ. मानसी गुरुनाथ कांबळे, उपसरपंच सौ. वृंद्धा श्रीकृष्ण पाध्ये, ग्रामपंचायत सदस्य सौ. सायराबानू इजाज म्हालदार, गुरुनाथ कांबळे, संतोष गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.