प्रतिष्ठा न्यूज

लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै – महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 21 : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2024 असून सांगली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले आहे.

जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग आधार हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षेपुर्वीचा नोंदणीकृत असावा. मागील तीन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग हा कोणत्याही संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच यापुर्वी राज्य अथवा केंद्र शासनाचा कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा. पुरस्कारासाठी लघु उद्योगाची निवड करताना त्याने केलेली भांडवली गुंतवणूक, अधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थापन, घटनेचे ठिकाण, सामाजिक कार्य, कर्मचारी सोयी सवलती, आयात-निर्यात क्षमता, स्वावलंबन तसेच उद्योजक हा नवीन पिढीतील नवउद्योजक असावा. उत्पादित वस्तु बाबतची गुणवत्ता इत्यादी विचार करण्यात येतो.

जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास 15 हजार रूपये व व्दितीय क्रमांकास 10 हजार रूपये, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र तसेच मानचिन्ह देण्यात येते. पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज करण्याकरीता तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन सांगली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.