प्रतिष्ठा न्यूज

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव खंडोबा यात्रेस दि. 22 डिसेंबर पासून प्रारंभ : प्रशासनाची जय्यत तयारी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.17 : माळेगाव खंडोबा यात्रा दक्षिणेतील काशी म्हणून ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
माळेगाव यात्रेची जिल्हा परिषद,नांदेड विभागाने, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात्रा दि. 22 डिसेंबर 2022 पासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रामध्ये दक्षिणेची काशी म्हणून ही यात्रा ओळखली जाते.
गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाचे सावट होते .मात्र यावर्षी यात्रा दि. 22 डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. या यात्रेच्या नियोजनाची नांदेड जिल्हा परिषद विभागाने जय्यत तयार केली आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी खंडेरायाची शासकीय पुजा आणि पालखीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच भव्य कृषी प्रदर्शनाचे, विविध स्टाॅलचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच विविध स्टाॅलचे उद्घाटन सुद्धा या दिवशी करण्यात येणार आहे. कृषी प्रदर्शन व भव्य स्टॉलचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 23 डिसेंबर रोजी डिसेंबर रोजी अश्व व श्वानाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. दि.24 डिसेंबर रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजन आणि बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दि. 25 डिसेंबर रोजी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दि.26 डिसेंबर रोजी कला महोत्सव व विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे. या यात्रेचा सर्व यात्रेकरूंनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षाताई घुगे ठाकूर यांनी केले आहे.
या यात्रेच्या यशस्वी,नियोजनासाठी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी श्री संदीप माळोदे, प्रकल्प संचालक अधिकारी श्री संजय तुबाकले, उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री मंजुषा कापसे, डॉ.सुधीर ठोंबरे, मुख्य लेख्खा व वित्त अधिकारी श्री शिवप्रसाद चन्ना,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री भुपेंद्र बोधनकर हे विशेष प्रयत्नशील आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.