प्रतिष्ठा न्यूज

तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासावा – युवराज शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासावा. त्याचे आचरण केल्यास त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही प्रस्टेशन ,अपयश येणार नाही. संकटावरती सहज मात करून यश प्राप्ती मिळेल. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला. 120 लढाया जिंकल्या. त्यांनी कधीही पराभव स्वीकारला नाही. कधीही माघार घेतली नाही. साम्राज्य टिकवत असताना अनेक पराक्रम मूठभर मावळ्यांसोबत केले. यातूनच सातत्य, धाडस ,मुसुद्दिपणा सामाजिक सदभावना, तरुणांना मिळेल. असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी व्यक्त केले.
मिरज मिशन चौकामध्ये संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांचा मराठा सेवा संघाचे सचिव अमृत तात्या सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या माहितीची पुस्तके देण्यात आली. साखर,पेढे जिलेबी वाटण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा- उपाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सचिव महेश भंडारे ,शहर उपाध्यक्ष नितीन पवार, राजू जाधव, अजय बंडगर , संदीप कांबळे, संदीप पवार,महेश चौगुले, भीमा यादवडे, प्रमोद पवार, रविराज कांबळे ,विनायक जाधव ,… मोरयाप्पा दोरकर ,राजू शिंदे ,साजिद पटवेकर ,सद्दाम ढोले ,मेहबूब मुल्ला, अवि शिंदे, अनिल कदम व कार्यकर्त्यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.