प्रतिष्ठा न्यूज

मानार डाव्या-उजव्या कालव्याचे पाणी मन्याड नदीत सोडण्याची मागणी

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.19 : पावसाळा सुरू होऊन जून महिना अर्धा उलटला तरी अद्याप पाऊस पडला नाही.त्यांमुळे शेतकरी वर्गात खरीप पेरणी लांबत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.या भागातील बहुतांश शेतकरी नगदी पिक कापसाची मोठ्या प्रमाणात मे महिन्याच 15 तारखेनंतर लागवड करीत असतात.मात्र पाऊस पडला नाही.त्यामुळे कापसाची लागवड करण्यात आली नाही. मन्याड नदीचे पाणी सुद्धा आटले आहे. मानार धरणाखाली मन्याड नदी आणि डावा,उजवा कालवा अंतर्गत हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आहे.मात्र सध्या पावसाचे आगमन झाले नाही त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची प्रतिक्षा करीत आहे. सध्या दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना पाण्याची आवश्यकता आहे. तरी मानार धरण बारूळ- वरवंट ता.कंधार येथील पाणी मन्याड नदी आणि उजव्या- डाव्या कालव्यात सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने कापूस लागवड करणारा शेतकरी थांबला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी कापसाची लागवड केली आहे. ज्याच्याकडे पाणीच उपलब्ध नाही तो शेतकरी आकाशाकडे बघत थांबला आहे. दरम्यान, मानार प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यास पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कौठा परिसरामध्ये यंदा शेतकरी कापूस लागवडीकडे वळला आहे. गतवर्षी सोयाबीन दरामध्ये झालेली मोठी घट पाहता शेतकरी यंदा कापूस लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसत आहे. बाजारात सोयाबीनचा दर कमी होत असल्याने शेतकरी कापूस लागवडीकडे वळला आहे.

ज्या शेतकऱ्याकडे हातचे पाणी आहे. त्यांनी कापसाची लागवड जून महिन्याच्या सुरुवातीलाच केली आहे. उगवण शक्ती चांगली असल्याने शेतकरी दिवसभर कापसाचे राखण करीत शेतावरच थांबून आहे. ज्याच्याकडे पाणीच नाही तो आकाशाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहे. सध्या या भागात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे.तरी मानार धरणाचे पाणी मन्याड नदी आणि उजव्या- डाव्या कालव्यात सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.