प्रतिष्ठा न्यूज

बेडगच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा 2024 मध्ये अप्रतिम यश

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : 7 जुलै 2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत एकूण 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात बेडग मधील पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात  यशस्वी झालेल्या विद्यार्थ्या मध्ये बेसिक लेव्हल मध्ये अथर्व पाटील -चॅम्पियन, वेदांत कागवाडे-प्रथम क्रमांक, आयुष लिंबीकई-तृतीय क्रमांकए श्रीवर्धन पाटील-पाचवा क्रमांक तर मास्टर ज्युनिअर लेव्हल मध्ये विश्वजीत पाटील-चॅम्पियन, आदित्य आवटी-चॅम्पियन, श्रेयस गायकवाड-प्रथम क्रमांक, आदित्य माने-चतुर्थ क्रमांक तसेच पहिल्या लेवल मध्ये श्रीवर्धन पवार यांनी पाचवा क्रमांक तर दुसऱ्या लेवलमध्ये असद मुल्ला-चॅम्पियन, अमृता कुंभार- प्रथम क्रमांक, सानिका कुंभार-द्वितीय क्रमांक व तिसऱ्या लेवल मध्ये वाजिद अली मुल्ला याने प्रथम क्रमांक पटकावला.
बेडग शाखेच्या शाखाअधिकारी सौ. रंजना सूर्यवंशी यांना बेस्ट टीचर अवॉर्ड ने सन्मानित केले गेले. गेली तीन वर्ष अबॅकस मध्ये सातत्याने बेडग येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. शाखेतील ऐश्वर्या मॅडम वैष्णवी मॅडम व रंजना मॅडम यांचे मोलाचे योगदान मुलांना मिळत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.