प्रतिष्ठा न्यूज

पाचवीला पुजलेल्या पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा : माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज दत्तनगर सूर्यवंशी प्लॉट, पटवर्धन कॉलनी, मगरमच्छ कॉलनी परिसरातील पुनर्वसन केलेल्या रोटरी क्लब, गणेश नगर येथील केंद्रात भेट देऊन माजी आमदार नितीन शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांची चौकशी केली. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तीस फुटांवर गेल्यानंतर या नागरिकांच्या घरामध्ये व घरावरून पाणी जाते. गेली पंधरा दिवस हे पूरग्रस्त बांधव पुनर्वसन केंद्रात राहत आहेत. या पंधरा दिवसात त्यांचा रोजगार बुडालेला आहे. मुलांच्या शाळेची गैरसोय होत आहे. तसेच काही मुले शाळेत ही जाऊ शकत नाहीत. दरवर्षी या पूरग्रस्त नागरिकांच्या घरांमध्ये महापुराचे पाणी येतं आणि हे पाणी थांबल्यामुळे त्यांच्या घरातील लोकोपयोगी साहित्यांचा नुकसान होत आहे. पूर ओसरल्यानंतर अस्वच्छतेमुळे त्या परिसरात रोगराई पसरते. त्या भागात राहणारे लोक हमाली, धुनी भांडी करणे, स्वयंपाक करणे, दुकानात कामाला जाणे अशा परिस्थितीतले लोक त्यांच्या आयुष्यात पाचवीला पुजलेला हा महापौर यावर सरकारने तातडीने या भागाचे पंचनामे करून सरकारी जागेमध्ये त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.
यावेळी बोलताना पूरग्रस्त बांधव म्हणाले की शासनाकडून जी मदत मिळते ती तुटपुंजी मिळते, राजकीय पुढारी फोटोसाठी तुटपुंजी मदत करतात. आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावे म्हणून पूरग्रस्त महिलांनी माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासमोर अश्रू ढाळले. यावर माजी आमदार नितीन शिंदे यांनी या पुरपट्ट्यातील नागरिकांना एकत्रित करून पूरग्रस्तांनी केलेल्या मागणीनुसार सरकारकडे पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी पैलवान प्रदीप निकम अनुज निकम आकाश काळेल आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.