प्रतिष्ठा न्यूज

३० वी एक तास राष्ट्रवादीसाठी विचार मंथन बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.

या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्यच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या सुचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची ३० वी बैठक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय याठिकाणी पार पडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले.

शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले की,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी फसव्या योजना जाहीर करत आहेत परिणामी महाराष्ट्र सरकारवर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे.जनता अशा फसव्या योजनांना भिक घालणार नाही.लोकसभेत ज्यापद्धतीने महायुतीला अपयश आले त्याच पद्धतीने विधानसभेला जनता महायुतीला योग्य ती जागा दाखवेल.

लाडकी बहीण योजना राबवताना जाणीवपूर्वक योजनेत त्रुटी निर्माण करून जाचक अटी तयार केल्यामुळे लाडक्या बहिणीला जाणीवपूर्वक योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करत आहे असे मत महिला शहरजिल्हाध्यक्षा संगीता हारगे यांनी व्यक्त केले.

सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ कमिट्या अद्ययावत ठेवण्याच्या सूचना केल्या शिवाय बूथ कमिट्याबाबत मार्गदर्शन केले.त्याचबरोबर येणारी सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी लढवण्याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत आहोत यामध्ये नक्की यश येईल असे मत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे ,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे,शहराध्यक्ष सागर घोडके ,हरिदास पाटील, उत्तम कांबळे, समीर कुपवाडे, छाया जाधव ,महालिंग हेगडे, उमर गवंडी ,वैशाली धुमाळ, प्रियांका विचारे,आशा पाटील ,वंदना चंदनशिवे,अनिता पांगम,विद्या कांबळे,संगिता जाधव,सुरेखा सातपुते,फिरोज मुल्ला,प्रकाश सूर्यवंशी, शितल खाडे,आकाराम कोळेकर,सुभाष तोडकर ,बालम मुजावर,दत्ता पाटील,विनायक बल्लोलदार,जमीर खान,डॉ किशोर चंदनशिवे,असीम फकीर ,राजू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.