“गुरुवर्य मटंगेबुवा पुरस्कार” प्रसिद्ध गायक श्रीरंग जोशी यांना प्रदान
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संस्कार भारती, सांगली जिल्हा समितीच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांची प्रकट मुलाखत झाली. या कार्यक्रमात कै. इंदिराबाई खाडिलकर स्मृतीप्रीत्यर्थ गुरुवर्य मटंगेबुवा पुरस्कार प्रसिद्ध गायक श्रीरंग जोशी यांना व सारंगीवादक महंमद हनीफ मुल्ला यांच्या स्मृती प्रीत्यर्थ साथीदार पुरस्कार विवेक पोतदार यांना अविनाश नारकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मानपत्र , सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.