प्रतिष्ठा न्यूज

थ्रिसुर ईस्ट, राज्य केरळ येथील १ कोटी ८० लाख सोन्याच्या फसवणुकीतील आरोपी अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : थ्रिसुर ईस्ट, राज्य केरळ येथील १ कोटी ८० लाख सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीस अटक करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कामगिरी केली. विश्वास रामचंद्र कदम, वय ३४ वर्षे, पत्ता कौठुळी, ता. आटपाडी जि. सांगली असे संशयिताचे नाव आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
यातील आरोपी विश्वास कदम याचे केरळ राज्यात सोन्याचे दागिनेवर हॉलमार्क करणेचे लक्ष्मी नावाचे दुकान आहे. त्यामध्ये त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघेजण पार्टनर आहेत. गुन्हयातील तक्रारदार यांनी आरोपी विश्वास कदम यांना २२५५.४० ग्रॅम सोन्याचे दागिने (१ कोटी ८० लाख किंमतीचे) हॉलमार्क करीता आरोपीकडे दिले असता आरोपींने ते विश्वासाने स्वतःजवळ ठेवुन घेवुन हॉलमार्क करुन ते फिर्यादीस परत न देता ते घेवुन पळुन गेला आहे, म्हणुन आरोपींने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन विश्वासघात केला आहे म्हणुन वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे.
तपासाचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळ येथील पोलीस पथक सांगली येथे आले होते. त्यावेळी सदर गुन्हयाच्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आरोपीस ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. वरीष्ठांचे सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील अधिकारी व अंमलदार

यांचे पथक आरोपीचा शोध घेणेसाठी रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना स्था. गु. अ. शाखा, सांगलीचे वरील पोलीस पथकास गुन्हयातील परागंदा आरोपी विश्वास रामचंद्र कदम हा भिवघाट, ता. खानापुर येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जावुन त्यास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतले संशयिताकडे गुन्हयाचे अनषंगाने विचारपुस करता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिलेली असुन गुन्हयातील मुद्देमाल त्यांने त्रिशुर, केरळ येथेच विकला असलेबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस ठाणे, थ्रिसुर ईस्ट, जिल्हा थ्रिसुर सिटी, राज्य केरळ पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सदर पोलीस करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सपोफौ अनिल पैनापुरे, पोहवा / अमोल पैदाळे, सुर्यकांत साळुंखे, सागर टिंगरे, हणमंत लोहार, कुबेर खोत, पोशि / सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, विनायक सुतार, रोहन गस्ते स्था. गु. अ. शाखा, पोशि / कॅप्टन गुंडवाडे, करण परेदशी सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.