प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज दि. 28 : तासगाव तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या “होम मिनिस्टर” अर्थात ” खेळ पैठणीचा” सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला या कार्यक्रमात भाग्यवान विजेत्या म्हणून तुरचीच्या ज्योती श्रीकांत माने या मानकरी ठरल्या.
हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, सांगली जिल्हा अध्यक्ष मा. जयवंत तात्या सूर्यवंशी, सांगली जिल्हा सचिव मधुकर गायकवाड,तालुका अध्यक्ष राजू काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तासगाव तालुका महिला अध्यक्षा सौ. लक्ष्मी (ताई )काळे यांच्या अध्यक्षतेखाली दत्त गंगा मल्टीपर्पज हॉल (मनेराजुरी )येथे मोठया उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनुक्रमे अक्षदा महेश साळुंखे – सावर्डे, प्रियांका प्रदीप गायकवाड – खुजगाव, वैष्णवी रणजित माने – हातनूर, सोनाली अजित काळे – मनेराजुरी, अनिता महादेव काळे – मनेराजुरी या सर्वानी पैठणी जिंकल्या तसेच मनाली माणिक काळे – मनेराजुरी, जयश्री विशाल गायकवाड – खुजगाव यांना सोन्याची नथ तर दीपिका मनोहर झेंडे – वायफळे, वर्षा परशराम गायकवाड यांना चांदिवर्क गणपती फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. अलका विलास खंडागळे सिद्धेवाडी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे विशेष आभार सांगली जिल्हा सचिव मधुकर गायकवाड व अजित काळे यांनी मानले हा कार्यक्रम वीर शिवा काशीद मंडळ मनेराजुरी, व वीर शिवा काशीद महिला मंडळ मनेराजुरी यांच्या सहकार्याने पार पडला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.