प्रतिष्ठा न्यूज

९२ लाखांच्या फसवणूक प्रकरणी. एम. ग्लोबल या कंपनीचा प्रमुख मिलींद गाडवे याचे विरुध्द सांगलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम व मा. अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी शेअर्स मार्केटचे माध्यमातुन फसवणुकीच्या तक्रारी संदर्भात कडक कारवाई करणे संदर्भात दिले आदेशा वरुन एस.एम. ग्लोबल या कंपनीने गुंतवणुक दारांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक केलेबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झालेने, प्राप्त तक्रारी अर्ज चौकशी वरुन विश्रामबाग पोलीस ठाणेत एस. एम. ग्लोबल या कंपनीचा प्रमुख मिलींद बाळासो गाडवे रा. सांगलीवाडी ता.मिरज जि. सांगली यांने ९२,०४,५१७/- रुपये रकमेची तक्रारदाराची फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झालेने नमुद आरोपी विरूध्द विश्रामबाग पोलीस ठाणेस गु.र.नं.३६८/२०२२ भा.द.वि.सं. क. ४२०, ४०६, सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण अधि. १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आर्थिक .

गुन्हे शाखा, सांगली हे करीत आहेत

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम व मा. अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांचे मार्गदर्शना खाली आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, सरनोबत, पो. हे.कॉ/ इरफान पखाली, पो. हे. कॉ./ उदय घाडगे, पो.हे.कॉ./ अमोल लोहार, पो.ना./ विनोद कदम, पो.ना./ दिपक रणखांबे यांनी केलेली आहे.

सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करणेत येते की, एस. एम. ग्लोबल, सांगली या कंपनीत गुंतवणुक केलेल्या ज्या गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणुक झालेली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग सांगली, येथे संपर्क साधावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.