प्रतिष्ठा न्यूज

चिंचणीत ज्योती काकींकडून गौरी गणपती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन: जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : खासदार संजय काका पाटील यांच्या घरी गौरी गणपती सणा निमित्त ज्योतीकाकी पाटील यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी सांगली  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कोरोनाच्या महाभयंकर महामारी नंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव सर्वत्र आनंदाने व उत्साहाने साजरा होत आहे.आपल्या या आनंदात आपल्या बरोबरच अहोरात्र काम करणारे सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घ्यावे या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतील या उद्देशाने काकींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.जिल्ह्यातील आटपाडी,उमदी, जत,विटा,खानापूर,तासगाव,पलूस, कुंडल,मिरज,सांगली,कवठेमहंकाळ येथील बहुसंख्य महिला हजारोंच्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी खासदार पत्नी सौ.ज्योतीताई संजय काका पाटील व त्यांच्या स्नुषा सौ.शिवानी प्रभाकर बाबा पाटील,व  वैष्णवी संजय काका पाटील तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले.उपस्थित महिलांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी मिरज विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमन खाडे,सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या सुविद्य पत्नी सौ मंजिरी गाडगीळ,जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत यांच्या पत्नी सौ वर्षाताई सावंत, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पद्मा गोपाळराजे पटवर्धन,सौ.सविता शिवणकर आदर्श शिक्षका,सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ संगीता खोत,सौ भिडे,तासगावच्या माजी उपनगराध्यक्षा सौ दिपाली ताई पाटील,कवठेमहांकाळ,तासगाव मधील नगरसेविका व ग्रामीण भागातील महिला जिल्हा परिषदेचे सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच व सदस्य मान्यवर उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.