प्रतिष्ठा न्यूज

करजगीचा तलाठी दुसऱ्यांदा लाच लुचपतच्या जाळ्यात

प्रतिष्ठा न्यूज
उमदी प्रतिनिधी : बेकायदा वाळू साठ्याबद्दल कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपये लाच घेतल्याबद्दल करजगी (ता. जत) येथील तलाठी बाळासाहेब शंकर जगताप (वय 57 रा. आसंगी, गुडापूर रोड ता. जत) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जगताप हा तलाठी दुसऱ्यांदा लाच लुचपतच्या जाळ्यात सापडला आहे. यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली होती.
तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी वाळू आणली आहे. तलाठी जगताप याने सदरचा वाळूसाठा बेकायदा असून त्याबद्दल कारवाई न करण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्याबद्दल तक्रारदार यांनी 12 जून रोजी लाचलीचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारीनुसार पडताळणी केली असता तलाठी जगताप याने तक्रारदाराने बेकायदा वाळू साठवणुक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी जगताप याच्या राहत्या घराजवळ सापळा लावला. तेव्हा तक्रारदाराकडून 50 हजार रुपये लाच रक्कम स्विकारली असता रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरीध्द उमदी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तलाठी जगताप याला यापूर्वी 2014 तक्रारदार यांच्या खरेदी दस्ताची नोंद घेवून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजार रूपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. तेव्हा त्याच्याविरूद मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हेप्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दुसऱ्यांदा लाच घेताना पकडण्यात आले.
उपाधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अंमलदार प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सिमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी कारवाई केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.