प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा येथील शेतकरी संघाच्या मॅनेजरना धरले धारेवर

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : आज सकाळी गगनबावडा येथील शेतकरी संघामध्ये धान्य व इत्तर वस्तू नेण्यासाठी सकाळी सहा वाजल्या पासून ग्राहक थांबले होते.  धान्य दुकान साडे आठ वाजता दुकान उघडनेची वेळ असतानाही  साडेदहा पर्यंत शाखा मॅनेजर दुकानात न आलेने ग्राहक संतापले. व ते आलेले पाहताच संतापलेल्या ग्राहकांनी प्रश्नांचा भडीमार करून मॅनेजर ना धारेवर धरले.
या धान्य दुकानात आजूबाजूच्या सांगशी, सैतवडे, भूतलवाडी, परगांवकरवाडी,रेव्याचीवाडी, बुवाचीवाडी,कातळी आदी सात ते आठ किलोमीटर वरून ग्राहक येत असतात. धान्यासाठी  खेपा मारून शेताचा दिवस खाडा करून येत असतात., डेअरीच्या वेळा असतात. धावपळ करताना सामान्य माणूस मेटाकुटीस येतो.
सुनील पडवळ, पप्पू कांबळे,सतीश पवार, आदी शंभर च्या आसपास ग्राहकांनी घेराव घालून जाब विचारला.असे पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घ्या. व ग्राहकाना वेटीस धरल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.