प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकांचे सामाजिक कार्य सर्वोत्कृष्ट आहे : माधवराव पा.शेळगावकर

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देऊन शिक्षक हेच भावी आदर्श नागरिक घडवितात , शिक्षकांचे सामाजिक कार्य हे सर्वोत्कृष्ट आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्वच्छता दूत श्री माधवराव पाटील शेळगावकर यांनी केले. ते राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. येथील ज्युनिअर कॉलेजचे प्रा. रामराव दिगंबरराव देशमुख हे 35 वर्षे नियमित सेवा कार्य बजावून आज दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा मान्यवर उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या वतीने शाल,श्रीफळ,सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रा.रामराव देशमुख यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरूवातीला राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रा.रामराव देशमुख यांच्या सेवापूर्ती गौरव
कार्यक्रमात श्री शेळगावकर हे बोलत होते .ते पुढे म्हणाले की शिक्षकांचे अध्यापन कार्य आनंददाई उत्कृष्ट कार्य आहे. शिक्षक हेच खरे समाज सुधारक आहेत .त्यांच्यामुळे भावी आदर्श नागरिक घडत असतात . विद्यार्थी नेहमी गुरूजीचा आदर करीत असतात. एखाद्या काजवा अंधारात चमकतो तो गुरूजीच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यशाची उच्च शिखरे गाठतात. काजवा जसा चमकत असतो तसे ते विद्यार्थी घडवीत असतात आज समाजातील परिस्थिती अत्यंत घातक बनत चालली असून समाज सुधारावयाचे असेल ,लोकशाही टिकवायची असेल असेल तर शिक्षकांनीच पुढाकार घ्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सेवानिवृत्ती गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री बालाजी हंगरगे हे होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन मु.अ.श्री बालाजी हंगरगे यांनी केले.
यावेळी विद्यालयाच्या हितचिंतक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.गायत्री वाडेकर मॅडम,श्री जी.व्ही. थेटे सर, उप मुख्याध्यापक डॉ. पांडुरंग यमलवाड, श्री टी.एन.रामनबैनवाड, पंजाबराव सावंत प्रा. सुभाषराव तिवडे, श्री बी.डी.देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेच्या मार्गदर्शिका प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.गायत्री वाडेकर ,श्री मधुकरराव देशमुख, श्री गोपाळ कदम ,श्री आनंदराव लाठकर, श्री चंद्रकांत सोनवणे, श्री देशमुख सर,श्री पी.डी जाधव सर ,श्री सुर्यकांत टापरे आदिजण उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद टापरे यांनी केले तर आभार श्री निर्मला खुळे मॅडम यांनी मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.