प्रतिष्ठा न्यूज

क्रीडा शिक्षक- संदीप येशियाड यांना “रजत पदक” राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : दिल्ली येथे झालेल्या नऊ देशाच्या एशियन मार्शल आर्ट 2023 च्या कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रजत पदक मिळवून महाराष्ट्राचे नावलौकीक केल्याबद्दल किनवट तालुक्यातील सारखणी येथील शासकीय आश्रम शाळेचे क्रीडा शिक्षक तथा तालुका क्रीडा मुख्य प्रशिक्षक मास्टर- संदीप येशियाड यांना “रजत पदक” राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते झाल्याबद्दल त्यांचा दि.31जुलै रोजी नांदेड येथे यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी- बि. के. पाटील (कटेकलुरकर), शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस- रविंद्र बंडेवार, मोहनावती पतसंस्था मुखेडचे संचालक तथा शिक्षक सेना मुखेडचे पदाधिकारी- शरद डावकरे, महानगर युवा संघटनेचे पदाधिकारी तथा मित्रमंडळी- प्रमोद जकुलवार, प्रमोद आटकेलवार, श्रीनिवास आटलावार, मनोज आऊलवार आदी सह अनेक जण उपस्थित होते.
 ● प्रतिष्ठा न्युज कडुन आपले अभिनंदन 💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.