प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीच्या निकृष्ट बांधकामाची दुबार तपासणी सुरू…* सोमवार,बुधवार व शुक्रवारी होणार तपासणी,तक्रारदार मनसेच्या अमोल काळे यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे विस्तारीत बेदाणा मार्केट मधील निकृष्ट बांधकामाची आता दुबार तपासणी सुरू झाली आहे. प्रत्येक आठवड्यातील सोमवार,बुधवार व शुक्रवारी होणार तपासणी,तक्रारदार मनसेच्या अमोल काळे यांनी माहिती दिली आहे.
यासंबंधी श्री.कुबेरा कन्स्ट्रक्शन प्रा.लि.सांगली,व मे.आर्क प्रमोद चौगुले,मे.चौगुले पाटील कन्स्लंटंटस प्रा.लि.सांगली यांना नोटीसा काढण्यात आल्याची माहिती मनसे नेते अमोल काळे यांनी दिली. तासगाव कृषी उत्पप्न बाजार समितीने निकृष्ट काम केल्याचा आरोप करत मनसेने याचा पाठपुरावा केला आहे.
बाजार समितीने विजयकुमार गणपतराव पाटील प्रो.पा.गणपती कन्स्लटन्सी सांगली यांचेकडून दुबार तपासणी करून घेणेचे ठरविले आहे. मनसे नेते अमोल काळे यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.