प्रतिष्ठा न्यूज

सांगली विधानसभा मतदार संघात ४० कोटींची कामे मंजूर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली विधानसभेसाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सांगली बस स्टॅन्ड ते अंकली गावापर्यंतचा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे करिता २५ कोटी, माधवनगर जुना रेल्वे ट्रॅक रस्ता कर्नाळ ते नांद्रे या रस्त्यामध्ये भूसंपादन व रस्ता सुधारणा करणे करिता ५ कोटी रुपये तसेच कर्नाळ रोडवरील मसोबा मंदिर ते शिवशंभो चौक रुंदीकरणासह सुधारणा करणे याकरिता ५ कोटी रुपये तसेच सांगली मिरज रोडवरील विजयनगर चौक ते कुपवाड रस्ता सुधारणा करणे याकरिता ४ कोटी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या असे एकूण ३९ कोटी ९८ लाख रुपये विधानसभेच्या रस्ते विकास कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सांगली शहरांमध्ये येणाऱ्या मंजूर रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे हे रस्ते मंजूर झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.