प्रतिष्ठा न्यूज

साळुंखे हायस्कूल हरिपूरमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा’

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हरिपूर दिनांक १५.येथील श्रीमती कोंडवाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल व प्रा. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी बाल विद्यालयात थोर शास्त्रज्ञ,माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन’ उत्साहात साजरा झाला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस श्री. विकास सूर्यवंशी व एमएसएन’चे संपादक श्री प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता बेनिचेटगे यांचे हस्ते माजी सनदी अधिकारी व ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख लिखित ‘जाता पंढरीशी’ ही पुस्तके व गुलापुष्प देऊन करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विकास सूर्यवंशी म्हणाले, “डॉ.कलाम साहेबांनी शालेय वयात वृत्तपत्रे घरोघरी पोहोचविण्याचे काम केले. यातून मिळालेल्या मोबदल्यामधून शिक्षणाला हातभार लागला.
स्वकष्टातून स्वावलंबनाचे धडे त्यांनी गिरवले. हेच कलाम साहेब जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती झाले देशांनी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. सारे जग त्यांचा सन्मान करत राहिले. हे सारे वाचनातून घडते. तुम्ही विद्यार्थ्यांनीही आपले शालेय ग्रंथालय, गावातील स्थानिक वाचनालय यामध्ये जाऊन पुस्तके वाचावीत आणि आपला आयुष्य फुलवावे. वृत्तपत्रेही तुम्हाला विश्वातील असंख्य घटना- घडामोडींचे ज्ञान करून देत असतात. तीही आपण वाचत चला. आपलं सामान्य ज्ञान वाढत राहील अनेक स्पर्धा परीक्षांसाठीही ते तुम्हाला उपयुक्त ठरेल. तुमचे जीवन समृद्ध बनेल.” असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘माय जर्नी’ या काव्यसंग्रहातील प्राचार्य विष्णू खोचीकर यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या ‘विकसित भारताचे स्वप्न’ या कवितेचे अभिवाचन विठ्ठल मोहिते यांनी करून; वाचन प्रेरणा दिनाची माहिती सांगितली.
राजकुमार हेरले यांनी प्रास्ताविक केले. अजितकुमार कोळी यांनी सूत्रसंचालन तर सुहास कोळी यांनी आभार मानले. याप्रसंगी सौ. गीतांजली आसगावकर, श्री. राजू बागुल,प्रल्हाद वडर , शिक्षक -सेवकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.